राम जन्मभूमीप्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येतील राम जन्मभूमी संदर्भातील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने करण्यात यावी अशी याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेकडून करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या खटल्याची सुनावणी तातडीने करण्यास नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीची तारीख याआधीच दिली आहे, असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे. 29 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी करण्यात आली होती. त्यावेळी देखील तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जानेवारी 2019 मधील तारीख देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेवर संतवर्गाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखिल भारतीय हिंद महासभेने तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र आज ही मागणी फेटाळून लावण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसफ यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.