
सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित समाजातील असल्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला, असा थेट आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज केला. एक केंद्रीय मंत्रीच असा आरोप करत असल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणीही आठवले यांनी केली आहे.
6 ऑक्टोबर रोजी राकेश किशोर या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकला होता. त्या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. गोवा राज्याच्या दौऱयावर असलेले रामदास आठवले यांनी पणजी येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला, असेही ते म्हणाले.