
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्रात येऊन कोणीही शिवसेनेला आव्हान दिले तर आम्ही त्याला गाडून टाकू असा इशारा शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. अमित शाह यांच्या लातूरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी हा इशारा दिला. देशभरात मोदींची लाट असताना राज्यात शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले आहेत, आता तर कोणतीही लाट नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘राज्यात युती झाली तर ठीक नाही तर विरोधीयोंको पटक देंगे’ असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूरमधील सभेत दिला होता. त्याच टीकेला कदम यांनी परखड शब्दांत झणझणीत उत्तर दिले आहे. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना गाडून टाकू असा इशाराच कदम यांनी दिला आहे.





























































