बंगाल अंतिम फेरीच्या मार्गावर; जॅक्सन-वसावडाच्या शतकामुळे सौराष्ट्र सुस्थितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली 34 वर्षे जेतेपदाच्या शोधात असलेल्या बंगालने अंतिम फेरीच्या दिशेने जोरदार पाऊल टाकले आहे. पहिल्या डावात 438 धावा केल्यानंतर आज तिसऱया दिवशी आकाश दीपच्या अचूक माऱयापुढे गतविजेत्या मध्य प्रदेशचा पहिला डाव 170 धावांतच आटोपला आणि बंगालने 268 धावांची प्रचंड आघाडी घेतली. तसेच दिवसअखेर दुसऱया डावात 2 बाद 59 अशी मजल मारत आपली आघाडी 327 पर्यंत नेली. त्यामुळे रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात बंगालचे एक पाऊल पडले आहे. आता केवळ चमत्कारच मध्य प्रदेशला अंतिम फेरीत पोहचवू शकतो.

आज बंगालच्या आकाश दीपने 42 धावांत 5 विकेट मिळवित मध्य प्रदेशचा पहिला डाव 170 धावांतच उद्ध्वस्त केला. मध्य प्रदेशकडून सारांश जैनने शुभम शर्माबरोबर 54 धावांची भागी रचली, पण आकाशने ती भागी फोडत मध्यप्रदेशचा डावाला सुरुंग लावला. त्यांचे शेवटचे चार फलंदाज 15 धावांत बाद झाले.

कर्नाटकच्या पहिल्या डावातील 407 धावा सौराष्ट्र गाठण्याच्या तयारीत आहे. शेल्डन जॅक्सन (160) आणि अर्पित वसावडा (ना. 112) यांच्या शतकांमुळे तिसऱया दिवशी केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात सौराष्ट्रने 288 धावा केल्या. आता त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी केवळ 44 धावांची गरज आहे. दिवसअखेर 4 बाद 364 धावा करून सौराष्ट्र मजबूत स्थितीत असून ते मोठी धावसंख्या करत सामन्यात आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

रणजी करंडक उपांत्य लढत

मध्य प्रदेश विरुद्ध बंगाल

बंगाल (प.डाव) –141.3 षटकांत सर्वबाद 438 मध्यप्रदेश (प. डाव) – 79 षटकांत सर्वबाद 170 ( हिमांशु मंत्री 23, सारांश जैन 65, शुभम शर्मा 44  ; शाहबाज अहमद 19-4-30-2, आकाश दीप 18-3-42-5) बंगाल (दु. डाव) – 29 षटकांत 2 बाद 59 (करण लाल 19, सुदीपकुमार खेळत आहे 12, अनुस्तुप मजुमदार खेळत आहे 9; सारांश जैन 8-1-13-1, कुमार कार्तिकेय 9-216-1)

कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र

कर्नाटक (प. डाव) –  133.3 षटकांत सर्वबाद 407 सौराष्ट्र (प. डाव) – 112 षटकांत 4 बाद 364 ( हार्विक देसाई 33, विश्वराज जडेजा 22, शेल्डन जॅक्सन 160, अर्पित वसावडा 112 ; विद्वत कावेरप्पा 28-5-64-2, वसुकी कौशिक 27-8-65-1)