’83’ : कपिल देव यांच्या रुपातील रणवीर सिंहचा फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित ’83’ या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंह याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत रणवीर ’83’ चित्रपटातील कपिल देव यांच्या रूपात दिसत आहे. कपिल देव यांच्याप्रमाणेच रणवीरने मिशा ठेवल्या आहेत आणि त्या काळात प्रसिद्ध असणाऱे लांब केस ठेवले आहेत. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

’83’ या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वविजयाचे स्पप्न पडद्यावर साकारण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर आणि इतर सहकारी कलाकारांनी धर्मशाला येथे जाऊन क्रिकेट खेळाडूंसोबत चर्चा केली होती आणि त्यांच्याकडून टीप्स घेतल्या होत्या. तसेच रणवीरने कपिल देव यांचीही भेट घेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.


View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

1983 साली झालेल्या सामन्यात ‘प्रोडेंशियल कप’ जिंकून हिंदुस्थानच्या संघानं क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरले. तसेच 25 जून 1983 रोजी लंडनच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध सामना खेळून हिंदुस्थानच्या संघाने वर्ल्डकप जिंकला होता. यावर आधारित चित्रपट काढण्याचे ठरवले तेव्हा यातील प्रमुख भूमिका म्हणजे ती कपिल देव यांची. सध्या ही भूमिका रणवीर साकारत असला तरी सर्वात आधी या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाचे नाव चर्चेत होते. परंतु काही कारणास्तव त्याची निवड झाली नाही, असे पिंकव्हीलाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.