
पत्नीचे अपहरण करत तिला बंदुकीचा धाक दाखवून दाखल केलेल्या केस मागे घेण्यास धमकावत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली आहे. याप्रकरणी 31 वर्षांच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पतीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने आरोपीशी दुसरे लग्न केले असून त्यांना मुलगी आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. वादातूनच पतीने पत्नीला बंदुकीचा धाक दाखवत मोटारीत बसवले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये नेत सरकारी दप्तरी लग्नाची नोंद करण्यावरून वाद घातला. त्याशिवाय दुसरे लग्न करावयाचे असून दाखल केस मागे घेण्यास सांगितले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.


























































