
डीटीएच सब्सक्राइबर्ससाठी आनंदाची वार्ता आहे. देशातील अनेक मोठय़ा ब्रॉडकास्टर्सनी आपल्या चॅनेलची किंमत सात रुपयांपर्यंत कमी केली आहे. यामध्ये स्टार, झी, वायकॉम 18 यांच्यासह अनेक ब्रॉडकास्टर्सचा समावेश आहे. हे चॅनेल बघण्यासाठी दर महिन्याला 19 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता 12 रुपये द्यावे लागणार आहे. ‘ट्राय’ने सर्व ब्रॉडकास्टर्स आणि ऑपरेटर्सला नव्या टॅरिफ नियमांचे पालन करण्याचे आदेश दिलेले आहेत.



























































