
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
नगरपरिषद रत्नागिरीच्या भरारी पथकाने गुरुवारी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना शहरात १०० पेक्षा अधिक दुकांनांवर धाडी टाकून ५०० किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक जप्त केले आहे. गुरुवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली नसली तरी यापुढे प्लास्टिक सापडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा नगर परिषदेने दिला आहे.
भरारी पथकामध्ये श्रेया शिरवटकर, जितेंद्र विचारे, नरेश आखाडे, उत्तम पाटील, आरिफ शे , संदेश कांबळे अन्य अधिकारी व आरोग्य विभागाच्या कर्मचारी सहभागी होते. बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्यास रु ५००० च्या दंडाची तरतूद असल्याने असा वापर टाळून नगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.






























































