
रत्नागिरीतील मिरकरवाडा समुद्रात आज एक मच्छिमार नौका बुडाली. नौका बुडताच तीन खलाशांनी समुद्रात उडी घेत पोहोत किनारा गाठला. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
सध्या ढगाळ वातावरण आणि समुद्रही खवळलेला आहे. अशावेळी जिक्रीया पटेल यांची बेहतूल रिजवान ही मच्छिमार नौका मासेमारीसाठी मिरकरवाडा बंदरात गेली होती. त्याचवेळी मासेमारी करत असताना नौका समुद्रात बुडाली. नौका बुडत असल्याचे कळताच नौकेवरील तांडेल आणि खलाशी अशा तिघांना पोहोत किनारा गाठला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.


























































