रत्नागिरी जिल्ह्यात उद्यापासून अनलॉक, अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 9 ते 4 यावेळेत मुभा

गेले आठवडाभर रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले लॉकडाऊन उद्यापासून शिथील करण्यात आले आहे. राज्यसरकारच्या घोषणेनुसार रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या स्तरावर येत असल्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील़. रेस्टॉरन्टना केवळ पार्सलसेवा आणि होमडिलीव्हरी करता येणार आहे़. लॉकडाऊनच्या काळात शनिवार आणि रविवारी पूर्णवेळ संचारबंदी राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जाहीर केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे़.

3 जून ते 9 जून दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता़. जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्हीटी रेट 13.90 टक्के आहे आणि ऑक्सीजन बेडची व्याप्ती 54.81 टक्के आहे़. त्यामुळे राज्यसरकारने जाहीर केल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या स्तरामध्ये येतो़. उद्यापासून जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे, सायकलींग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहणार आहे़. शनिवार, रविवारी बंद राहतील़. शासकीय कार्यालयात आणि सुट असलेल्या खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहील़. लग्न समारंभासाठी 25 लोकांच्या उपस्थितीची परवानगी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून घ्यावी लागणार आहे़. अंत्यविधीलाही 20 लोकांचीच उपस्थिती असेल़. ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय आहे अशीच बांधकामे सुरु राहतील़. कृषी आणि कृषी पुरक सेवा सोमवार ते रविवार सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील़. अत्यावश्यक सेवेत येणार्या सर्व ई कॉमर्स सेवा सुरु राहतील़. व्यायामाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील़. पण या ठिकाणी लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक केले आहे़. सार्वजनिक वाहतूक सेवा 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील़. मालवाहतूक नियमित सुरु राहील़. प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरु राहील़. मात्र पाचव्या स्तरावरील जिल्ह्यातून येण्यासाठी ई पास बंधनकारक असेल़. अशा प्रकारच्या अटींचा या आदेशात समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या