
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात सोमवारी पुन्हा एकदा शेतकरी आणि मच्छिमार रस्त्यावर उतरले असून अणुऊर्जा प्रकल्पस्थळी जनहक्क सेवा समितीने जेलभरो आंदोलन छेडले आहे .माडबन हटावं…कोकण बचाव,चले जाव चले जाव अणुऊर्जा चले जाव,एकच गर्जा नको अणुउर्जा अशा घोषणा देत हे जेलभरो आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, आमदार राजन साळवी,मन्सूर सोलकर, अमजद बोरकर,अलिमिया म्हस्कर, राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, माजी जि. प. शिक्षण व अर्थ सभापती दीपक नागले, राजापूर तालुका पंचायत समिती सभापती अभिजित तेली, उपसभापती प्रशांत गावकर, व मोठ्या संख्येने मच्छिमार बंधू, शेतकरी, प्रकल्पग्रस्त बंधू-भगिनी उपस्थित होते.





























































