
खेड येथे चाकूचा धाक दाखवून 59 लाख रूपये लुटणाऱ्या गुन्ह्यातील तीन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरूवारी पकडले. आज त्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्य आरोपी किशोर रघुनाथ पवार ऊर्फ पिंटया (रा.हर्णे, ता.दापोली) याने फिर्यादी व साक्षीदार यांना 2 किलो सोन्याचा व्यवहार करण्याचे निमित्ताने कामाक्षी पेट्रोलपंपाच्या अलिकडे असणाऱ्या कच्च्या डांबरी रोडने कॅनोलजवळ बोलावले. तेथे साथीदारांच्या मदतीने चाकुचा धाक दाखवुन, शिवीगाळी दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन 59 लाख रुपये घेऊन पळुन काढला. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पथकाने ताब्यात घेतले होते. या आरोपींना आज न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपींना 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. आरोपींकडूव अद्याप पर्यंत 36,00,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड- प्रविण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की व त्यांचे पथक पुढील तपास करत आहे.



























































