
6 जानेवारी सायंकाळी चारच्या सुमारास राजापूर येथील पेंडखळे भवानी मंदिर येथे विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विजेच्या तीव्र धक्क्याने तीथवली येथील रहिवाशी असलेला तरुण वायरमेन अनिकेत परवडी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
ऑपरेटर कडून वीज वाहिनी बंद करून तो दुरुस्तीसाठी खांबावर चढला होता. मात्र विजेच्या तीव्र धक्क्याने तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.वीज प्रवाह परत कसा सुरु झाला, याबाबत चौकशी सुरु आहे. एका युवक वायरमनच्या झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाने तिथवलीसह राजापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


























































