Ratnagiri News -प्रियकरानेच प्रेयसीचा काटा काढला, खून करून मृतदेह आंबा घाटात फेकला

प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने साथीदारांच्या मदतीने खून केला आणि मृतदेह आंबा घाटात फेकून दिला. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून ट्रेकरच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय भक्ती मयेकर ही तरुणी 10 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. शोध लागत नसल्याने तिच्या भावाने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. तिच्या नातेवाईकांनी त्या युवतीचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी दुर्वास पाटील याला ताब्यात घेऊन तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तपास केला असता त्याने तोंड उघडले. दुर्वास पाटील याने भक्तीला 16 ऑगस्ट रोजी पावणे आठ वाजता सायली देशी बारमध्ये बोलावून घेतल आणि दोन सहकाऱ्यांच्या मदतीने कट रचून तिचा खून केला. तसेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह आंबा घाटात नेऊन फेकल्याच सुद्धा त्याने सांगितलं. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तात्काळ आंबा घाटाकडे धाव घेतली आणि ट्रेकरच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आहे.