रत्नागिरीत ओणनवसे डांबरी रस्ता खचला, दापोलीकडील संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोलीत धो धो कोसळणार्‍या पावसामुळे ओणनवसे इंगळेवाडी ते गुडघे मारूती मंदिर स्टॉप उतारातील रस्ता ठिक ठिकाणी खचला आहे. काही ठिकाणी हा रस्ता दीड फुट खाली खचला असून उंबरघर गुडघे गावातील जनतेचा ओणनवसे दाभोळ दापोली संपर्क तुटला आहे.

दापोली तालुक्यातील 32 गावातील व्यापार उदीमांसह रहदारीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असा रस्ता असलेल्या दापोली ओणनवसे उंबरघर मार्गावरील ओणनवसे इंगळेवाडी ते गुडघे गावा दरम्यान मारूती मंदिर स्टॉप उतारातील रस्ता  ठिक ठिकाणी खचला आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्याला उभ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगांनी  अजून रस्ता खचेल की काय याची भिती लोकांच्या मनात भरली आहे.