रत्नागिरीत परप्रांतीय नौका पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरीत परप्रांतीय नौका पकडण्यात आली आहे. जयगड समुद्र किनाऱ्यापासून 12 ते 15 वाव मध्ये मच्छिमारी करणारी मलपी येथे ही नौका पकडण्यात आली. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि रत्नागिरी पोलीस दलाने हि संयुक्त कारवाई केली.

जयगड येथे मासेमारी करणारी शरथ लक्ष्मण करकेश यांच्या मालकीची शरण्य नावाची मलपी येथील नौका पकडून तिच्यावर कारवाई करण्यात आली. नोकेवर 62325 रुपये किमंतीची मासळी सापडली. ही कारवाई परवाना अधिकारी संतोष देसाई,पर्यवेक्षक तुषार करगुटकर,मयुरेश दवडे,सहाय्यक पोलीस फौजदार विज्ञान दाभोळकर,वाहनचालक सुनील झापडेकर,पुजारी आणि खोत यांचा सहभाग घेतला.