रत्नागिरी पंचायत समितीचे 20 गणांचे आरक्षण जाहीर

रत्नागिरी पंचायत समितीच्या 20 गणांसाठी आज लोकनेते शामराव पेजे सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.यामध्ये दहा गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले.त्यामध्ये नाणीज गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे-

सर्वसाधारण- करबुडे,कोतवडे,साखरतर,खेडशी,केळ्ये,कुवांरबाव,नाचणे,गोळप

सर्वसाधारण महिला- वाटद,कळझोंडी,नेवरे,झाडगाव म्युन्सिपल हद्दीबाहेर,भाट्ये,गावखडी

नागारिकांचा मागास प्रवर्ग – हरचिरी,पावस

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- खालगांव,हातखंबा,कर्ला

अनुसूचित जाती महिला- नाणीज