रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला कॅबिनेट मंत्री होण्याचा मान उदय सामंत यांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी आजचा दिवस सुवर्णदिन ठरला. रत्नागिरीचे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा निकालही आजच जाहीर झाला. चुरशीच्या या लढतीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी विजयी झाले. त्यामुळे रत्नागिरीत आज फटाक्यांची आतषबाजी आणि भगवा जल्लोष पहायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यसरकारमध्ये शिवसेनेचा पहिला कॅबिनेट मंत्री होण्याचा सन्मान उदय सामंत यांना मिळाला आहे.

राज्यमंत्री मंडळाचा सोमवारी विस्तार झाला. रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच रत्नागिरीतील जयस्तंभ येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करत आनंद साजरा केला. यावेळी आमदार उदय सामंत यांचे वडील उद्योजक रवींद्र सामंत, जिल्हाप्रमुख विलास चाळके, नुतन नगराध्यक्ष प्रदीप साळवी, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला तालुका संघटक कांचन नागवेकर, महिला शहर संघटक, मनिषा बामणे, युवासेना महाराष्ट्र सदस्य सुजीत कीर, सर्व नगरसेवक, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

uday-samant

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून राज्यमंत्री होण्याचा पहिला मान उदय सामंत यांनाच मिळाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला कॅबिनेट मंत्री होण्याचा पहिला मान भास्कर जाधव यांच्या नावावर आहे.

रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; सभापतीपदी प्राजक्ता पाटील, उपसभापतीपदी दत्तात्रय मयेकर