रत्नागिरी जिल्ह्यात 33 हजार 694 शेतकऱ्यांचे भातपीक उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाकडून भातशेतीचे पंचनामे सुरु आहेत. आतापर्यंत बाधीत 5994 हेक्टर पैकी 84 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळी पावसाचा 33 हजार 694 शेतकऱ्यांना फटका बसला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

कोकणातील बळीराजाला आदित्य ठाकरे यांनी दिला धीर

जिल्ह्यात यंदा प्रचंड पाऊस पडला.ऑक्टोबर महिन्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे कोकणातील मुख्यपीक असलेल्या भाताचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील भातपीकाच्या अंदाजे 39 हजार 145 हेक्टर क्षेत्रापैकी 5 हजार 994 हेक्टर क्षेत्रातील भातपीकाचे नुकसान झाले. आतापर्यंत 85 टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. अवकाळी पावसाचा 33 हजार 642 भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला. त्यापैकी 28 हजार 533 शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या भाताचे पंचनामे केले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे नाशकात, ओल्या दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी