रत्नागिरी जिल्हय़ात वर्षभरात 21 शाळांना लागले टाळे; शाळांची पटसंख्या 4 हजार 526 ने घटली, सहा खासगी शाळाही पडल्या बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिह्यातील जिल्हापरिषदेच्या मराठी शाळांची दिवसेंदिवस घटत आहे. गेल्या वर्षभरात जिस्हापरिषद शाळांची 4 हजार 526 विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षात जिल्हापरिषदेच्या 21 शाळा बंद झाल्या आहेत.पटसंख्येअभावी सहा खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा ओस पडत आहेत. शून्य पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद होत आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तब्बल 21 शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद करण्यात आल्या आहेत. गुरूजी आहेत पण विद्यार्थी नाहीत अशी अवस्था शाळांची झाली आहे. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करून त्या शाळा बंद करण्यात येतात. पटसंख्या घटण्याचा फटका खासगी शाळांना बसला असून 2025-26 याकालावधीत 6 खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 2026-27 या शैक्षणिक वर्षात शून्य पटसंख्या शाळांतील शिक्षकांचे दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यानंतर बंद पडलेल्या शाळांचा आकडा पुढे येईल.