शास्त्री गुरुजींचे लक्ष आता आयपीएल अथवा समालोचनाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाच्या ‘महागुरू’ पदावरून टी-20 विश्वचषकानंतर पायउतार होणाऱया रवी शास्त्री यांनी आता भविष्यात आयपीएलमधील संघांचा प्रशिक्षक अथवा समालोचक (कॉमेंटरी ) म्हणून काम करण्याचे ठरवले आहे. गेल्या 15 वर्षांत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांनी दोनदा जबाबदारी पार पाडली आहे. विशेषतः क्रिकेटर म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेट समालोचक म्हणून शास्त्री हे अतिशय लोकप्रिय झाले होते. मात्र एखाद्या आयपीएल संघाचे प्रशिक्षकपद मिळाल्यास तीही जबाबदारी शास्त्री यांना आवडणारी आहे.

समालोचकाच्या भूमिकेतून शास्त्री प्रशिक्षकपदी आले होते. टीम इंडियातून खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर रवी शास्त्री यांनी समालोचक म्हणून आपला कार्यकाळ लोकप्रिय ठरवला. प्रदीर्घ काळ कॉमेंटेटर म्हणून गाजवल्यानंतर शास्त्री संघ प्रशिक्षणाकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांची प्राधान्याने पसंती क्रिकेट समालोचनाला असेल असे बोलले जातेय. मात्र आयपीएल ही सोन्याची अंडे देणारी काsंबडी असल्याने एखाद्या मोठय़ा संघाकडून प्रशिक्षक पदाची ऑफर आल्यास शास्त्री ती स्वीकारू शकतात.