
चीनमधून पसरलेला कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरला. याचा सर्वाधिक फटका इटली या देशाला बसला. चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 171 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे, तर 3 हजार 277 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत आतापर्यंत 63 हजार 927 जणांना कोरोनाची लागण झाली असून तब्बल 6 हजार 77 जणांचा मृत्यू झाला आहे.
पण चीनपेक्षा इटलीत कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढला ?
Hug Campaign
चीनमध्ये जेव्हा हा कोरोना पसरला तेव्हा इटलीत एका चीनी नागरिकाने Hug Campaign सुरू केले. एका गर्दीतल्या ठिकाणी हा तरुण एक पोस्टर घेऊन उभा राहिला. “मी व्हायरस नाही, मी माणूस आहे, भेदभाव नष्ट करा” असे या पोस्टरवर लिहिले होते. नंतर जमावातील अनेक लोकांनी त्याला तरुणाला मिठी मारली. इटलीतील फ्लॉरेन्सचे महापौर दारियो नारदेला यांनी या अभियानाला पाठिंबा देत एका चीनी तरुणाला स्वतः मिठी मारली. त्यामुळेच इटलीत हा कोरोना व्हायरस झपाट्याने पसरला असे म्हटले जाते. असे असले तरी या कारणाला कुठलेच शास्त्रीय आधार नाही असे म्हटले जाते.
वृद्ध व्यक्तींची लोकसंख्या
इटलीत वृद्ध व्यक्तींची लोकसंख्या सर्वाधिक आहे. इटलीची लोकसंख्या 6 कोटी असून लोकसंख्येत वृद्ध नागरिकांचा दुसरा क्रमांक लागतो. ज्या वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांचे वत 80-100 दरम्यान होते.
कोरोना टेस्ट न करणे
इटलीत अनेक लोकांची कोरोना टेस्ट झालीच नाही. कोरोनाचे लक्षण दिसूनही अनेकांनी कोरोनाची टेस्ट केलीच नाही. त्यामुळे संपूर्ण देशात या विषाणूचा प्रादुर्भाव झाला.
खालावलेली आरोग्य सुविधा
इटलीत आधीच आरोग्य सुविधा खालावलेली आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण आला. तसेच डॉक्टरांकडेही या विषाणूपासून वाचण्यासाठी कुठलेच साधन नव्हते. म्हणून त्यांनाही या विषाणूची लागण झाली.
स्वविलगीकरणाबद्दल अज्ञान
युरोपमधील राष्ट्रांत फिरण्यासाठी तुम्हाला पासपोर्टची गरज नाही. तसेच इटली हा देश, स्ट्रीट फूड, आर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशनसाठी ओळखला जातो. इथे जेव्हा विलगीकरणासाठी लोकांना सुट्टी जाहीर केली तेव्हा लोक बाहेर पडले आणि ठिकठिकाणी फिरून आपली सुट्टी घालवली त्यामुळे हा विषाणू आणखीणच पसरला
लॉकडाऊन करण्यास उशीर
लोकांनी गर्दी करू नये त्यामुळे हा विषाणू पसरत नाही. त्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. इटलीत लॉकडाऊन केला गेला जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. वेळीच लॉकडाऊन केले असते तर परिस्थिती हातात असती.


























































