चमचमीत चिकन पकोडे रेसीपी

1965

साहित्य

५०० ग्रॅम बोनलेस चिकनचे तुकडे
चवीनुसार मीठ
१ चमचा लाल तिखट
१/४ चमचा हळद
२ चमचा आले लसूण पेस्ट
१/२ चमचा गरम मसाला पावडर
१/२ चमचा भाजलेली धनेपूड
१/२ चमचा मिरपुड
१०० ग्रॅम बेसन
२ चमचे मक्याचे पीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ अंडे
१/४ ओवा
५ कडिपत्त्याची पाने
२ चमचे दही
तळण्यापुरते तेल
४-५ हिरव्या मिरच्या

कृती

१. सर्वप्रथम, एक मोठे भांडे घ्या, त्यात बोनलेस चिकनचे तुकडे घाला; त्यात चवीनुसार मीठ घालून लाल तिखट, हळद, आले लसूण पेस्ट, धणे पूड, गरम मसाला पावडर, काळी मिरी पूड, दही आणि अंडे टाकून ते मिश्रण १ तास मॅरिनेट करायला ठेवा.

२. नंतर बेसन,हळद, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मक्याचे पीठ याचे बटाटे भजीसाठी तयार करतो तसे पीठ तयार करा.

३. कढईत तेल गरम करा.

४. चिकनचे टुकड़े बेसनच्या मिश्रणान घोळवून तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.

५.गरमा गरम चिकन पकोडे सर्व्ह करा

आपली प्रतिक्रिया द्या