स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गाकरिता ज्युनिअर असोशिएट (कस्टमर सपोर्ट अॅण्ड सेल्स) या पदासाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या नोकरभरतीत स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे, यासाठी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे ऑनलाइन, ऑफलाइन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार सदर नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), उल्हास बिले (9821878441) यांच्याशी संपर्प साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.
इच्छुक उमेदवारांनी या नोकरभरतीकरता https://sbi.bank.in/web/careers/cureent-openings या संकेतस्थळावर गुरुवार, 27 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराचे वय आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादित शासकीय नियमानुसार सवलत/शिथिलता असेल. सदर नोकरभरतीसाठी जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आव्हान महासंघातर्फे करण्यात येत आहे.



























































