आरोपीच्या लाल केसांवरून गुन्ह्याची उकल, कोंढवा पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. आरोपीच्या लाल केसांवरून तिघाजणांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. इम्रान दस्तगीर सय्यद (20), मुफिज जलाल मुल्ला (20), उमेर उमर खान (सर्व रा. कोंढवा) आणि फरदान ताबीश सय्यद (रा. शिरूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यश बाबासाहेब सोनावणे यांनी तक्रार दिली आहे.

चॅटिंग अ‍ॅपद्वारे ओळख करून आरोपीने यशला कोंढव्यातील मिठानगरमध्ये बोलाविले. त्यानंतर आरोपींनी इतर साथीदारांना बोलावून यशला मारहाण करून 1 लाख 20 हजारांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी तरुणाला लुटणारे दोघेजण मिठानगर परिसरातील संडे बाजार परिसरात असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांना मिळाली.

त्यापैकी एका आरोपीचे केस लाल असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून इम्रान आणि मुफिजला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार उमेरच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी फरदान याने सोशल मीडियावर एका चॅटिंग अ‍ॅपद्वारे मैत्री केली होती. त्यानंतर आरोपींनी यशला मिठानगर परिसरात बोलावून मारहाण करीत लूटमार केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पृथ्वीराज पांडुळे, अभिजीत रत्नपारखी, मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली.