जिओच्या ग्राहकांना खुशखबर, स्वस्तातील दोन प्लॅन्स पुन्हा उपलब्ध

रियायन्स जिओच्या ग्रहाकांसाठी खुशखबर आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडीयाद्वारे दुसऱ्या नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात आल्यानंतर जिओने दोन स्वस्तातील प्लॅन्स पुन्हा एकदा युझर्सला उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण करण्याचा जिओचा प्रयत्न आहे. जिओने 98 रुपये आणि 149 रुपयांचे दोन प्लॅन्स पुन्हा एकदा उपलब्ध करून दिले आहेत.

टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला टॅरिफ शुल्कामध्ये वाढ केली. जवळपास 40 टक्क्यांपेक्षा अधिक ही वाढ असल्याने सर्वच कंपन्यांचे प्लॅन्स महागले आणि यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. यामुळे कंपन्या देखील आपल्या प्लॅन्समध्ये बदल करत आहेत. जिओने देखील आपले दोन जुने स्वस्तातील प्लॅन्स पुन्हा लॉन्च केले आहेत.

टॅरिफ शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर दिवसाला 1 जीबी डेटा देणारा एकही प्लॅन जिओकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे युझर्सने नाराजी व्यक्त केली होती. आता 149 रुपयांचा प्लॅन पुन्हा उपलब्ध करून दिल्याने युझर्सने आनंद व्यक्त केला आहे. या प्लॅनमध्ये युझर्सल दिवसाला 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळतात. याची मर्यादा 24 दिवस आहे.

jio

तर 98 रुपयांच्या प्लॅनची मर्यादा 28 दिवस असून व्हॅलिडीटी पीरियडसाठी एकूण 2 जीबी डेटाची ऑफर देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युझर्सला जिओ टू जिओ फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

jio1

आपली प्रतिक्रिया द्या