
अनोळखी नंबरवरून आलेले कॉल ओळखण्यासाठी आपल्याला ट्रु कॉलरची मदत होते. मात्र आपल्यापैकी कुणाला ट्रू कॉलर अॅपच्या यादीतून स्वतःचे नाव रद्द करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स वापराव्या लागतील. आपल्या अॅन्ड्रॉईड किंवा आयओएस फोनवर जाऊन मेनू ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर सेटिंग्जमध्ये जाऊन करून प्रायव्हसी सेंटर पर्याय निवडा. डिऑक्टिवेट अकाऊंट ऑप्शन निवडा त्यानंतर ट्र कॉलर अनलिस्ट पेजवर जा. कंट्री कोडसोबत आपला मोबाईल अॅड करा. अॅनालिस्ट ऑप्शन टॅप करा आणि डिएक्टिवेशनसाठी कारण द्या. त्यानंतर आपला फोन नंबर 24 तासांच्या आत यातून अनलिस्ट होईल.



























































