रेणापूर येथे शेतकऱ्याची फसवणूक, 19 हजार आणि मोबाईल घेतला काढून

548

जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यास फसवण्यात आल्याची घटना घडली. त्याच्याजवळील 19 हजार 500 रुपये आणि मोबाईल काढून घेण्यात आला असून या प्रकरणी एका विरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात नानासाहेब बाबासाहेब चव्हाण (65, रा. वाला ता. रेणापूर) यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी हे रेणापूर तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी काम करून देणारे खाजगी व्यक्ती गंगाधर बाबूराव चव्हाण (रा.रुपचंदनगर रेणापूर) हे भेटले. त्यांना जातप्रमाणपत्रासाठीच्या कागदपत्राची विचारणा केली असता त्याने फिर्यादी नानासाहेब चव्हाण यांच्याकडून मोबाईल मागून घेतला. व तहसील मधून बाहेर आल्यानंतर त्याच्या मागे फिर्यादीही तहसीलमधून बाहेर आले.

आरोपी बोलत बोलत त्यांना जिल्हा परिषद शाळेकडे घेऊन गेला आणि तिथे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादी जवळ 19 हजार 500 रुपये होते, त्यामधील 200 रुपये देत असताना गंगाधर चव्हाण याने त्यांच्याजवळील सर्व पैसे हिसकावून घेतले आणि तिथून पळून गेला. रेणापूर पोलीस ठाण्यात गंगाधर चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या