गृह, वाहन कर्जे आणखी स्वस्त होणार, रेपो रेटमध्ये पाचव्यांदा कपात होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला मदतीचा हात देणार्‍या रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये आणखी कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह, वाहन आदी कर्जे स्वस्त होणार आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करणार्‍यांसाठी मोठी खूशखबर ठरणार आहे.

यासंदर्भात बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) बैठक होणार असून 4 ऑक्टोबरला दरकपातीची घोषणा केली जाईल, अशी शक्यता सूत्रांनी बुधवारी व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षातील रेपो रेट कपातीची ही पाचवी महत्त्वपूर्ण घोषणा असेल. सध्याचा रेपो रेट 5/40 टक्के आहे. शुक्रवारी या दरात 25 बेसिस पॉइंटस्ची कपात केली गेली तर नवीन रेपो रेट 5/15 टक्क्यांवर जाणार आहे. आर्थिक कर्ष 2019-20च्या अखेरपर्यंत रेपो रेट 5 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. उर्करित 15 बेसिस पॉइंटस्ची कपात डिसेंबरपर्यंत शक्य आहे, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

विकासदर पाच टक्क्यांवर

आर्थिक मंदीचे ग्रहण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या मदतीने ठोस पावले उचलली आहेत. जूनमध्ये झालेल्या तिमाहीत देशाचा विकासदर पाच टक्क्यांकर पोहोचला. हा विकासदर गेल्या 6 कर्षांतील सर्कात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. आर्थिक गती वाढवण्यासाठी एका बाजूला बँकांचा व्याजदर कमी होत आहे. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा वाचेल आणि ते खर्च करतील. त्यामुळे मागणी वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.