रिपब्लिक टीव्हीच्या डिस्टिब्युटरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. चॅनल्स पाहण्यासाठी खिसा गरम केल्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या डिस्टिब्युटरचे प्रमुख घनश्याम सिंगला क्राईम ब्रँचने अटक केली. घनश्यामच्या अटकेने अटक आरोपीची संख्या 12 झाली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी या पूर्वी क्राईम ब्रँचने रिपब्लिक टीव्हीचे डिस्टिब्युटर घनश्याम सिंगची चौकशी केली होती. तपासा दरम्यान अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत घनश्यामचे नाव समोर आले. गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी (सीआययु) प्रभारी निरीक्षक सचिन वाझे यांच्या पथकातील संतोष कोतवाल, रियाझ काझी, कीर्ती माने आदी अधिकाऱ्याचे पथक ठाण्यात गेले. तेथून घनश्यामला अटक करून मुंबईत आणले.

घनश्यामने अभिजितला किती पैसे दिले होते. चॅनल्सचे प्रसारण करण्यासाठी मल्टी सिस्टम ऑपरेटर आणि डायरेकट टू होमच्या कोणत्या अधिकाऱ्याशी घनश्यामने संपर्क केला होता का याचा तपास क्राईम ब्रँच करणार आहे. पोलिसांना घनश्यामच्या मोबाईलमध्ये काही अटक आरोपीचे नंबर मिळाले आहेत.