आता ATM मध्ये चलनी नोटांसह नाणीही मिळणार, RBI 12 शहरांमध्ये विशेष सेवा सुरू करणार

एटीएम मशीनमध्ये डेबीट कार्ड स्वाईप करून तुम्ही अनेकदा कोऱ्या करकरीत नोटा काढल्या असतील. परंतु आता एटीएममधून चलनी नोटांसह नाणीही मिळणार आहेत. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ प्रायोगिक तत्वावर 12 शहरांमध्ये याचे मशीन लावणार आहे. चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत माहिती दिली.

मध्यवर्ती बँक QR-आधारित कॉईन व्हेंडिंग मशीनचा पायलट प्रकल्प सुरू करणार आहे. नाण्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात 12 शहरांमध्ये ही सेवा सुरू करणार असून या मशिन्सचा वापर यूपीआयच्या माध्यमातून केला जाईल आणि बँकेच्या नोटांऐवजी नाणी जारी केली जातील, अशी माहितीही दास यांनी दिली.

रिझर्व्ह बँक 12 शहरांमध्ये QR कोड आधारित कॉईन वेंडिंग मशीन (QCVM) वर पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. ही व्हेंडिंग मशीन बँक नोटांऐवजी UPI वापरून ग्राहकाच्या खात्यातून डेबिट करून नाणी वितरीत करतील. त्यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होईल. या मशीन्सचा वापर करून नाण्यांच्या वितरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना निर्देश दिले जातील, असे दास म्हणाले.

रेपो रेट वाढीचा सिक्सर, सलग सहाव्यांदा वाढ; कर्जे पुन्हा महागणार

रेपो रेटमध्ये वाढ

रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण जाहीर केले. यामध्ये सलग सहाव्यांदा रेपोरेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. 0.35 बेसिस पॉईंटने वाढ केल्यामुळे रेपोरेट 6.25 वरून थेट 6.50 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कारलोन, गृहकर्जासह सर्व कर्जांच्या ईएमआयमध्ये वाढ होईल.