एप्रिल महिन्यात वाढली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वधारले भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

देशात महागाई वाढली असून एप्रिलमध्ये महागाईचा दर 2.92 टक्के होता. तर मार्च महागाईचा दर 2.86 टक्के होता. एका महिन्यात 0.6 टक्क्यांनी महागाई वाढली आहे. जीवनावश्यव वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने मार्चमध्ये महागाईचा दर वाढला आहे.

ग्रामीण भागात कमी प्रमाणात महागाई वाढली आहे. मार्च महिन्यात ग्रामीण भागात महागाईचा दर 1.80 टक्के होता तर एप्रिलमध्ये वाढून तो 1.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाज्यांच्या किंमतीचा दरही वाढला आहे. एप्रिलमध्ये 0.3 टक्के इतकी वाढ होती. ती मार्चमध्ये 1.1 टक्क्यांवर पोहोचली आहे.

2019-20 या आर्थिक वर्षात 0.60 टक्क्यांनी महगाई वाढेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. तर क्रिसिल या आर्थि संस्थेने महागाई दर 7 टक्यांवर जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे.