>> हर्षल देव
रणावीन स्वातंत्र्य कोणा मिळेना
असा भूतकालीन सिद्धांत जाणे
स्वातंत्र्यकवी गोविंद दरेकरांच्या या ओळी हिंदुस्थानच्या देदीप्यमान पराक्रमी इतिहासाला तंतोतंत लागू होतात. श्रीराम, श्रीपृष्ण यांच्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या आताच्या सैनिकांपर्यंत सर्वांनीच हे स्वातंत्र्य पराक्रमाने मिळवलं आणि ते आपल्या पराक्रमावर टिकवून ठेवलं. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात एकांगी प्रचारामुळे सशस्त्र क्रांतीचा इतिहास बऱयाच प्रमाणात झापून ठेवला गेला. परंतु सत्य कधी लपत नाही या न्यायाने आज इतिहासाचे मोठय़ा प्रमाणात पुनर्संशोधन आणि लेखन होत आहे. ‘वारंवार उच्चार म्हणजे प्रचार’ हे तत्त्व लक्षात घेऊन डॉ. नारायणराव सावरकरांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर यांनी अरुण बक्षी आणि अनुराधा खोत यांच्या सहाय्याने ‘यशोगीत सैनिकांचे (1857 ते 1947)’ हे पुस्तक सिद्ध केलं आहे.
पराक्रमाचा पूर्वेतिहास अर्थात आपल्या पराक्रमी पूर्वजांची संक्षिप्त कथा सांगून पुस्तक 1857च्या आपल्या देशातील लोकांनी एकसंघाने केलेल्या लढय़ाकडे वळते. त्यात मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, पीर अली इत्यादींबद्दल नोंदी वाचायला मिळतात. यानंतर अनेकांनी केलेले सशस्त्र प्रयत्न, लोकमान्य टिळकांचे धोरण, प्रथम विश्व युद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाज जागृतीचे कार्य, अंदमानपर्व, देशभक्त रासबिहास बसू आणि त्यांचे पत्रव्यवहार, सावरकर-बोस भेट, सैन्यभरतीमध्ये डॉ. बा.शि. मुंजे प्रभृतींचा सहभाग, यानंतर आझाद हिंद फौजेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली झालेले कार्य, नेताजींच्या संशयास्पद अपघातानंतर नौदल आणि वायुदलाने इंग्रजांविरुद्ध केलेला विद्रोह या सर्व चितरताना विषय पुठेही खाली पडू दिला नाही. सुरुवातीपासून राष्ट्रभक्ती चेतवण्याची जी उठावणी घेतली आहे ती अखेरपर्यंत.
1947च्या स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या घटनेपर्यंत न थांबता नेपाळी आंदोलन, सिंधुसुक्त, प्राचार्य राम शेवाळकरांचे महत्त्वाचे उद्गार, सावरकरांची राष्ट्रीयत्वाची संकल्पना, स्वातंत्र्योत्तर काळातील सीमेवरील लढे यांचासुद्धा आढावा घेऊन लोकमान्यांचा गीता रहास्यातील कर्मयोग आणि सावरकरांचे हिंदुत्व यांची सांगड लेखिकेने या पुस्तकात घातली आहे. आज वैश्विक महामारी आणि चीन-पाकचे हिंदुस्थानघाती धोरण लक्षात घेता शस्त्रसज्ज राष्ट्र आणि आर्थिक बळ याची आवश्यकता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात उद्धृत केली आहे. तिरंग्याचा आधार घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सैनिकांच्या चित्रांनी विकास फडके यांनी मुखपृष्ठ तयार केले आहे.
यशोगीत सैनिकांचे
लेखिका ः स्वामिनी सावरकर
प्रकाशक ः पृष्णा प्रकाशन-
विद्याधर ठाणेकर
पृष्ठs ः 96, मूल्य ः रुपये 130/-





























































