मैत्रीचा कॅलिडोस्कोप

41

>> प्रा. डॉ. श्रीनिवास पांडे

ज्येष्ठ कथालेखक मधुकर धर्मापुरीकर यांचा ‘मिळून मिसळून’ हा संग्रह एक केगळे असे कैशिष्टय़ घेऊन सिद्ध झाला आहे. पंचाकन्न मित्रांच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखसंग्रहात त्या पंचावन्न मित्रांत ‘सेल्फी’ नावाने स्वतःवर लिहिलेल्या लेखाचाही समावेश आहे. या लेखनाचे स्व रूप सांगणारा हा परिचय लेख.

माणसाला अनेक मित्र असतात. तो स्कतः ज्या व्यवसायात असतो, ज्या स्वभाकाचा असतो, अगदी त्याच व्यवसायातले, त्याच स्वभावाचे ते मित्र असतात असे थोडेच असते? उलट एकाच व्यवसायातल्या-एकाच प्रकृतीच्या माणसाची मैत्री ही चोपडी होऊन जाते. जिव्हाळ्याची कमीच. मधुकर धर्मापुरीकरांचा नवीन संग्रह ‘मिळून मिसळून’ हा अनोखा आहे. वेगवेगळ्या व्यवसायातली, वेगवेगळ्या स्तरांतली जुनी-नवी कितीतरी मित्रमंडळी धर्मापुरीकरांनी आयुष्यभर जमविली आहेत. त्यापैकी काही (म्हणजे पंचावन्न!) मित्रांवर आपल्या निर्मळ, खुसखुशीत आणि तितक्याच जिव्हाळ्याने लिहिलेल्या नेटक्या लेखांचा हा संग्रह म्हणजे ‘मिळून मिसळून’. यातली मित्रमंडळी वाचकांच्या ओळखीची नसतीलही; मात्र संग्रह वाचून झाल्यावर त्या त्या व्यक्तींच्या स्वभाव रेषांच्या अनुषंगाने नजरेसमोर धुक्यातली व्यक्ती यावी तसे वाटत राहते आणि त्या व्यक्तीशी आपणही दोस्ती करून घ्यावी असे वाटते ही या संग्रहाची खासीयत म्हणावी लागेल!

धर्मापुरीकर मुळात अकाऊंट ऍण्ड फायनान्स विभागातून सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांना विविध प्रकारचे छंद-आवडी आणि सगळ्या छंदांच्या अनुभवाचे रूपांतर शब्दांतून करायची त्यांची लेखन शैली. संग्रहातल्या मित्रांच्या निमित्ताने केलेले हे लेखन वाचताना धर्मापुरीकरांच्या बहुविध आवडी निवडीचे छान दर्शन होते. मुळात संग्रहाला धर्मापुरीकरांचे जे निवेदन आहे, त्यात अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा त्यांनी मांडला आहे आणि लेखनाचे प्रयोजन समर्पकपणे मांडले आहे. कै. विश्राम बेडेकरांच्या आत्मवृत्तातला एक महत्त्काचा संदर्भ धर्मापुरीकरांनी नमूद केला आहे तो म्हणजे क्कांटम थिअरीच्या खुबीदार प्रत्ययाचा. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघतो, तेव्हा त्या नुसत्या बघण्यानंच बघितलेल्या गोष्टीत बदल होत असतो. हा सिद्धांत त्यांनी इथे मैत्री संबंधाच्या संदर्भात मांडून म्हटले आहे की, आपण जेव्हा एखाद्या मित्राशी बोलत असतो, त्याच्या सहवासात असतो, तेव्हा आपण थोडे त्याच्यासारखेच होतो आणि तोसुद्धा तेवढय़ा वेळेपुरता आपल्यासारखाच होऊन जातो!

धर्मापुरीकर मित्रांबद्दल जेक्हा सांगत असतात तेव्हा त्याच्यासारखेच होऊन बोलता बोलताच स्वतःचे वैशिष्टय़ही कसे मांडून जातात याचा अनुभक हा संग्रह काचताना होतो, ते फारच गुंतवून टाकणारे असे आहे. धर्मापुरीकर मित्रांच्या निमित्ताने अनुषंगिक उर्दू शेर, हिंदी कविता, व्यंगचित्रे, इंग्रजी कोटेशन्सचा एकढय़ा मोकळेपणाने वापर करतात की वाटून जाते, केवळ एवढय़ा संदर्भासाठीसुद्धा हे पुस्तक काचायला हवे.

महत्त्वाचे म्हणजे दोन-तीन अपवाद वगळले तर मित्रांच्या लेखांची जी शीर्षकं दिली आहेत. ती अतिशय सुरेख आणि लेख वाचण्याची उत्सुकता वाढविणारे आहेत. ‘सभ्यतेचा एकांत’, ‘घरटे शोधणारे पीस’, ‘अवघड असणारा सहज’, ‘कोंदणाबाहेरचे रत्न’, ‘ग्रंथांचा स्वर’, ‘शायरीचा पूल’ अशी काही त्याची उदाहरणे देता येतील. संतोष घोंगडे यांचे देखणे आणि पाहता क्षणीच लक्ष केधून घेणारे मुखपृष्ठ या संग्रहाला लाभले आहे. संग्रहाच्या ब्लर्बकर मोठा छान उल्लेख आहे- प्रतिध्कनी उमटणारी एक जागा असते. तिथून साद दिली की, इथून प्रतिसाद उमटणार.

‘मिळून मिसळून’ या संग्रहात धर्मापुरीकर आणि त्यांच्या मित्रांत अशीच साद आणि प्रतिसाद प्रत्येक लेखातून आपल्याला ऐकायला मिळते.

मिळून मिसळून
लेखक ः मधुकर धर्मापुरीकर
प्रकाशक ः अभंग प्रकाशन
पृष्ठs ः 232 मूल्य ः 200 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या