
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एका खंडणी प्रकरणात सहआरोपी असलेला तसेच कुख्यात दाऊदचा निकटवर्ती रियाझ भाटी याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आपल्या पत्नीला परपुरुषासह लैंगिक संबध ठेवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात रियाझ भाटीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.
रियाझ भाटीविरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. भाटीने आपल्या पत्नीला एका व्यक्तीसह लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले व त्याचे व्हिडीओ रेकार्ंडगही केले. खंडणीसाठी धमकावल्यामुळे वर्सोवा पोलीस ठाण्यात रियाझविरोधात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रियाझ भाटीने ऍड. अनिकेत निकम आणि ऍड. विवेक आरोटे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलासा देण्यास नकार देत रियाझ भाटीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.



























































