प्रेक्षकच माझी खरी ताकद !

2499

>> मंगेश दराडे

सैराट सिनेमातील आर्ची या भूमिकेमुळे रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आता ‘मेकअप’ या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

‘मेकअप’ या सिनेमात रिंकू पूर्वी नावाच्या तरुणीची भूमिका साकारतेय. भूमिकेबाबत रिंकू म्हणाली, मेकअप शब्द उच्चारताच चटकन आपल्याला डोळ्यासमोर चेहऱ्यावरची रंगरंगोटी येते. पण पूर्वीचा मेकअप आहे तो अंतरमनाचा आणि परिस्थितीचा आहे. रोजच्या जीवनात आपणही वेगवेगळ्या परिस्थितीत मुखवटे घेऊन वावरतो. आपल्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण समोरच्याला येऊ देत नाही. अशी साधी सरळ गोष्ट सिनेमात आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रिंकूचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळतोय. सुरुवातीला प्रेक्षकांना माझा लूक आवडतोय की नाही याचे दडपण होते. उलट हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याच्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे तिने सांगितले. सैराटनंतर केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडचे प्रेक्षकदेखील रिंकूकडे आशेने बघत आहेत. याबाबत ती म्हणाली, प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचे प्रेम हवे असते. प्रेक्षक मला भरभरून प्रेम देतायत त्यामुळे खूपच छान वाटतेय. प्रेक्षक हेच माझी ताकत असून त्यांचे प्रेमच मला नवनवीन काम करण्याची स्फूर्ती देते असे ती नम्रपणे सांगते.

मी सिंपल गर्ल

खऱ्या आयुष्यात तुला मेकअप करायला आवडतो का? असे विचारताच क्षणाचाही विलंब लावता अजिबात नाहीमी सिंपल गर्ल असल्याचे ती म्हणाली. लवकरच रिंकू एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. पण आताच त्याबद्दल सांगणे घाईचे होईल असे ती म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या