दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत उसळली दंगल, मुस्लिम समाज लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलंबो

गेल्या महिन्यात श्रीलंका दहशतवादी हल्ल्याने हादरला होता. आता श्रीलंकेच्या निगोम्बो भागात ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजमध्ये हिंसा भडकली आहे. त्यानंतर या भागात दंगल ऊसळली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने कर्फ्यु लागू केला आहे.

दंगलीत मुस्लिम समाजला लक्ष्य केले जात असून त्यांची घरं आणि दुकानांवर हल्ला करण्यात आला आहे. अजून तरी यात कुठल्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. या दंगलीत आतापर्यंत तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

दंगलीनंतर श्रीलंकेत्च्या रोमन कॅथलिक चर्चने लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच दंगलग्रस्त भागाग्त दारू बंदी करण्याची मागणी केली आहे. तसेच मुस्लिम हे आपलेच भाऊ आहे त्यांच्यांवर हल्ले करू नका ही आपली संस्कृती नाही असेही चर्चने म्हटले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सोशल मीडियावरही बंदी घातली आहे. नेगोम्बो भागात 100 पोलिसांची तुकडी पोहोचली असून दंगल शमवण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.