ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

दिल्लीचा युवा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला प्रथमच हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेट संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी बुधवारी ‘टीम इंडिया’ची घोषणा करण्यात आली. पाठीच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विश्रांती  देण्यात आली असून मोहम्मद शमी कसोटी संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आहे.

कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुखापतीतून अद्याप सावरलेला नसल्याने ‘आयपीएल’ स्पर्धा गाजविणाऱया ऋषभ पंतची संघात वर्णी लागली. मात्र या संघात दिनेश कार्तिकचाही समावेश असल्यामुळे पंतला अंतिम संघात स्थान मिळणार का याबद्दल शंकाच आहे. याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झालेल्या जसप्रीत बुमराहला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे, मात्र दुखापतीतून न सावरल्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असणार नाही. १८ खेळाडूंच्या चमूमध्ये रोहित शर्माला यावेळीही कसोटी संघात पुनरागमन करता आले नाही. त्याच्या जागी करुण नायरला पसंती देण्यात आली आहे. मराठमोळय़ा शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

हिंदुस्थानचा कसोटी संघ  : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शिखर धवन लोकेश राहुल, मुरली विजय , चेतेश्वर पुजारा, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन , रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , हार्दिक पांडय़ा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव , जसप्रीत बुमराह , शार्दुल ठाकूर.

हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक

पहिली कसोटी  : १ ते५ ऑगस्ट, बर्मिंगहॅम
दुसरी कसोटी    : ९ ते १३ ऑगस्ट, लॉर्डस्
तिसरी कसोटी   :  १८ ते २२ ऑगस्ट, नॉटिंगहॅम
चौथी कसोटी     : ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, साऊदम्पटन
पाचवी कसोटी    : ७ ते 11 सप्टेंबर, द ओव्हल