रिषभ पंतची कमाल, धोनीच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,अॅडलेड

हिंदुस्थानी संघाचा विकेटकीपर रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळण्यात मोठा हातभार लावला आहे. हिंदुस्थानी गोलंदाजांनी कमाल करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 235 धावांवर रोखलं. गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीवर रिषभ पंतने कळस चढवत 6 झेल पकडले. पहिल्या डावात केलेल्या कामगिरीमुळे पंतने धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. धोनीने 2008 साली वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात 6 जणांचे झेल पकडले होते. परदेशात सर्वात जास्त झेल पकडणारा यष्टीरक्षक म्हणून धोनीने त्यावेळी रेकॉर्ड केला होता. या रेकॉर्डशी रिषभ पंतने आता बरोबरी साधली आहे.