ऋषभ पंत आला रे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या यंदाच्या 17 व्या हंगामात खेळताना दिसणार आहे. कार अपघातातून बचावलेला दिल्ली कॅपिटल्सचा हा माजी कर्णधार आता तंदुरुस्त झाला असून तो नुकताच बंगळुरूजवळील अलूर येथे सराव सामन्यात खेळताना दिसला. मात्र अद्याप याबाबत दिल्ली कॅपिटल्सच्या संघव्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. ऋषभ पंत या स्पर्धेत फलंदाजी करताना दिसणार आहे, मात्र यष्टिरक्षणाची जबाबदारीही दुसऱया एखाद्या खेळाडूवर सोपवली जाऊ शकते. दुखापतीमुळे टीम इंडियापासून बाहेर असलेला पंत अलूर येथे पहिला सराव सामना खेळला.