चिपळूणमध्ये परशुराम घाटात दरड हटविण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

चिपळूण तालुक्यात परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला.आज शनिवारी दुपारी तीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावर  ही घटना घडली. त्यानंतर महामार्गावरील दरड हटविण्याचे काम सुरु झाले.

जगबुडी आणि वशिष्ठी नद्यानी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड आणि चिपळूण शहरात पूर आला.आज दुपारी अडीच वाजता परशुराम घाटात दरड कोसळली होती.महामार्ग ठप्प झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.