
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका करताना शेअर केलेल्या कवितेला प्रत्युत्तर देताना रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना सणसणीत टोला लगावला.
”कशासाठी आमदार व्हायचं असतं, काय करू लागली. जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली. ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली. इतकं भंपकपणा बरा नव्हे. बस कर पगली”, असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला.