
महाराष्ट्रातील गावांवर आपला हक्क सांगणाऱ्या आणि आमच्या राज्यात पाय ठेवू नका अशी महाराष्ट्रातील मंत्र्यांना धमकी देणाऱ्या बसवराज बोम्मईंच्या कर्नाटकाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी अचानक दौरा केला. त्यांनी बेळगाव मध्ये येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि सीमा लढ्यातील भरीव योगदान देणाऱ्या जेष्ठांची भेट घेतली. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दिपक दळवी, रमाकांत कोंडुस्कर या सारख्यांचा समावेश होता.
सीमा लढ्यातील जेष्ठ नेतृत्व, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष मा.दिपक दळवी साहेब यांची बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. pic.twitter.com/XyFxZFQ98L
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2022
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन उद्यानातील आपल्या मराठी अस्मितेचे मानबिंदू ,आपले आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळेस श्री.रमाकांत कोंडुस्कर दादा व स्थानिक मराठी बांधव देखील उपस्थित होते. pic.twitter.com/3ymE7xdDyU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2022
रोहित पवार यांनी बेळगाव भेटीदरम्यान शहरातील ज्योतिबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळई त्यांनी जोतिबासमोर साकडे घालताना प्रार्थना केली की, मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट होऊ दे.
बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले. pic.twitter.com/GApTShgZNn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2022
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक वर्ष धुमसत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी या वादात तेल ओतून वादाची आग भडकावण्याचे काम केले आहे. कर्नाटकने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. मिंधे सरकारच्या 2 मंत्र्यांनी आपण कर्नाटकात जाणार असल्याची घोषणा केली होती. आधी 3 डिसेंबर आणि नंतर 6 डिसेंबर अशी तारीखही त्यासाठी जाहीर करण्यात आली होती. मात्र बोम्मई यांनी आमच्या राज्यात पाऊल ठेवायचे नाही अशी धमकी दिल्याने या मंत्र्यांनी 6 डिसेंबरचा दौरा रद्द करून टाकला होता. आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही दडपणापुढे न झुकता बेळगावात जाण्याचा मानस पूर्ण करून दाखवला.

























































