
अजित पवार यांच्या विमान अपघातात आकस्मिक मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी केली. या चौकशीच्या वेळी व्ही के. सिंग यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शुक्रवारी रोहित पवार यांनी सीआयडी कार्यालयाला भेट देत तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी देखील सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरात गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
AAIB चा रिपोर्ट आल्यानंतर VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन मागील भेटीच्यावेळी CID च्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं, पण हा अहवाल येऊन आठ दिवस झाले तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसंच काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग याला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट देण्यात… pic.twitter.com/S8cFPX70U8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2026
”AAIB चा रिपोर्ट आल्यानंतर VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन मागील भेटीच्यावेळी CID च्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं, पण हा अहवाल येऊन आठ दिवस झाले तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसंच काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग याला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट देण्यात आली, CID ऑफिसमध्ये एके-४७ सह त्याच्या सुरक्षा गार्डला परवानगी देण्यात आली, म्हणूनच आज पुन्हा CID च्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली, परंतु आजही गुन्हा दाखल करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि फायनल रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचं नवीन आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं”, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
कितीही वेळकाढूपणा केला तरी आम्ही पाठपुरावा सुरुच ठेवू – रोहित पवार
”व्ही. के. सिंग कुणाचंतरी नाव घेईल म्हणून त्याला वाचवण्यासाठी व्ही. के. सिंगला जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जात आहे का, असा आमचा प्रश्न आहे. पण कितीही वेळकाढूपणा केला किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही सुरुच ठेवणार”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.




























































