रोनाल्डोची गर्लफ्रेंड संघाच्या मॅनेजरवर भडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा विश्वचषकमधून पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव केल्याने विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक होता. त्याचे संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्नही त्यामुळे भंगले आहे.

रोनाल्डोची गर्लफ्रेड जॉर्जिना रॉड्रिग्जने इन्टाग्रामवर संताप व्यक्त करत या सगळ्याला पोर्तुगाल संघाचा मॅनेजर फर्नांडो सँटोस हाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आज रोनाल्डोच्या प्रशिक्षक आणि मित्राने चुकीचा निर्णय घेतला, तो मित्र ज्याच्यावर तू विश्वास ठेवला आणि त्याचा खूप आदर केला. तू सामन्यात परतल्यानंतर सामन्याचा चेहरा बदलला होता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असे म्हणत फर्नांडोनेच अप्रत्यक्षपणे रोनाल्डोचा विश्वासघात केल्याचा आरोप तिने केला आहे.