
गुलाबाचा चहा….या चहाबाबत काही माहित आहे का? नसेल तर आपण या चहाबाबत जाणून घेऊया. गुलाब फुलापासून तयार केलेला हा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया गुलाब चहाचे फायदे.
गुलाब चहा बनवण्याची पद्धत
घरच्याघरी बनवता येईल असा हा सोपा चहा आहे. सगळ्यात आधी दोन गुलाबाची फुलं घ्या. त्यानंतर दोन कप गरम पाणी करा. त्यानंतर गरम पाण्यात त्या गुलाबाच्या पाकळ्या टाका. दहा मिनीटे त्या पाकळ्या त्यात उकळू द्याव्यात. दहा मिनीटानंतर हे पाणी गाळून एका कपमध्ये घ्या.त्यानंतर त्यात थोडेसे लिंबू आणि मध घाला. हा चहा नियमित घ्या. हा चहा दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकता. या चहामुळे त्वचाही चमकदार होते.
गुलाब चहाचे फायदे
- गुलाब चहामध्ये असलेले अॅण्टी ऑक्सिडेण्ट वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
- गुलाब चहा हर्बल चहा असून त्याने पचनक्रिया चांगली होते.
- याचबरोबर चहा आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतो. त्यामुळे निरोगी आणि उत्साही राहण्यास मदत मिळते.
- गुलाबाची चहा हा कॅफिन फ्री असतो, जो आरोग्यासाठी उपयुक्त असून त्याने पोट भरल्यासारखे वाटते.
- या सगळ्याबरोबर हर्बस चहा आजारांपासून दूर ठेवते आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत बनवते. यामध्ये जीवनसत्व क ची भरपूर मात्रा असते.
- हा चहा नियमित प्यायल्याने त्वचेचा रंग उजळतो. एवढेच नाही तर केसही मजबूत होतात.
- तुम्हाला माहित असेल की गुलाबाच्या सुगंधाने स्ट्रेस कमी होतो आणि मूडही चांगला होतो.
































































