2000 रुपयांच्या नोटेबाबतच्या चर्चांना पूर्णविराम; निर्मला सीतारमण यांनी संसदेत दिली महत्त्वाची माहिती

अनेक दिवसांपासून 2000 रुपयांच्या चलनी नोटांबाबत चर्चा सुरू आहेत. या नोटांची छपाई बंद झाली आहे. चलनात या नोटा कमी करण्यात आल्या आहेत. तसेच आता एटीएममशीनमध्येही 2000 रुपयांच्या नोटा ठेवण्यात येणार नाही, याबाबत चर्चा सुरू आहेत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतीरमण यांनी संसदेत माहिती देत याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एटीएम मशिनमध्ये 2000 रुपयांच्या नोटा भरणे किंवा न भरण्याबाबत बँकांना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत स्पष्ट केले. किती रुपयांच्या नोटा कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये ठेवायच्या हे बँका स्वतः ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च 2017 अखेर आणि मार्च 2022 अखेरीस 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 9.512 लाख कोटी रुपये आणि 27.057 लाख कोटी रुपये होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा न भरण्यासाठी बँकांना कोणतीही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेली नाही. बँका एटीएममधील रकमेचे मूल्यांकन करतात आणि मागील वापराच्या आधारावर कोणत्या नोटांची जास्त गरज आहे. यावरून मशीनमध्ये कोणत्या चलनी नोटा ठेवायच्या ते ठरवतात, असे त्यांनी सांगितले.