आम्ही मंदिराच्या बाहेर दांडा घेऊन रखवाली करणारे लोक, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर, धर्मपीठ, पीठाधिपती यासंदर्भात महत्त्वाचं विधान करत संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. अमरावती येथे सिंधी समाजाच्या भव्य सामाजिक कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाचे विधान केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणावेळी संघाची भूमिका स्पष्ट केली. ‘कोणत्या धर्मपीठावर कुणाचं पीठारोहण होत असेल तर तिथे माझं काम नाही’, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. त्याच वेळी आपल्या विधानाला अधिक बळकटी देत ते म्हणाले की, ‘आम्ही मंदिराच्या बाहेर दांडा घेऊन रखवाली करणारे लोक आहोत. मंदिराच्या आतील गोष्टी आमच्या हातातील नाहीत.’ असे ते म्हणताच जय श्रीरामच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या.