
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लग्न…विवाह… ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. लग्नानंतर नवविवाहीत जोडप्यांना वेध लागलेले असतात ते मधुचंद्राचे. परंतु काही कारणास्तव अनेकांना मधुचंद्राला जाताही येत नाही. टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक हिलाही लग्नानंतर मधुचंद्र साजरा करण्यासाठी जाता आले नाही. याबाबतची माहिती तिने स्वत: दिली असून यामागील कारणांचा खुलासाही तिने केला आहे.
टीव्हीवरील ‘शक्ति अस्तित्व के एहसास की’ या मालिकेतून प्रसिद्धी शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री रुबीना दिलैक हिने तिचा प्रियकर अभिनव शुक्ला याच्यासोबत गेल्या महिन्यात लग्न केले. परंतु लग्नानंतर हे दोघेही आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. एचटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर रुबीनाला मधुचंद्रासाठीही जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. याबाबात बोलताना रुबीना म्हणाली की, ‘सध्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामध्ये संतुलन बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. अभिनवला माझ्या हातचे जेवण खूप आवडते आणि आम्ही प्रत्येक क्षण आनंदात जगत आहोत.’
पुढे ती म्हणते की, ‘एकमेकांसोबत वेळ घालवणे आमच्यासोबत खूपच एक्साईटेड आहे. खासगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये वेळेचे नियोजन करावा लागत आहे. शुटिंगनंतर पॅक अप झाले की एकमेकांची भेट घेणे किंवा फोन करणे सगळेच पाहावे लागते. हा देखील एक वेगळा अनुभव आहे. कामामुळे आम्ही अजुनही मधुंचंद्रासाठी जाऊ शकलेलो नाही. कामाप्रती निष्ठेमुळे अशा गोष्टी होतच राहतात. काही महिने असेल चालणार आहे. त्यानंतर कुठे जायचे याबाबत मी काही ठिकाणं ठरवली आहेत.’
























































