टिव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक कायम चर्चेत असते. ती आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत कनेक्टेड असते. नुकतेच रुबिनाने राणी गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या सिल्क लेहेंग्यामध्ये इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये ती सुंदर दिसत असून युजर्सने तिच्या फोटोंचे कौतुक केले आहे. डिझायनर अर्चना कोचरने हा लेहेंगा डिझाईन केला असून त्यावर फुलांचे सोनेरी ब्रोकेड डिझाइन आहे त्यावर तिने स्ट्रॅपलेस बॅंडेड ब्लाउज घातला असून त्यावर तिने ऑर्गेन्झा दुपट्टा घेतला होता. तसेच तिने गळ्यात मॅक्सिमलिस्ट पेंण्डेटसह सोन्याचा महाराणी नेकलेस, हातात फुलांचे डिझाईन असलेल्या सोन्याच्या बांगड्या आहेत. यावर रुबिनाने केस मोकळे सोडले होते. तर तिने चेहऱ्यावर न्यूडमेकअप केलेला दिसत आहे.